मुंबई : ल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या कृषी विधेयकावरून देशभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना कंगनाने या आंदोलकांना ‘दहशतवादी’ म्हटले आहे.
कृषी विधेयावरुन पंजाब आणि हरयाणात आंदोलन चिघळले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शेतकऱ्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. एमएसपी व्यवस्था यापुढेही सुरू राहणार असून शेतीमालाची खरेदी सरकार करणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
या ट्वीटला रिट्विट करत कंगना राणावत म्हणाली, ‘पंतप्रधान मोदीजी, जे झोपले आहेत त्यांना जागे करता येईल. पण जे झोपेचे सोंग घेत आहेत त्यांना कसे जागे करणार? तुम्ही कितीही समजवून सांगितले तरी त्यांना काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी सीएएला विरोध केला होता. सीएए विरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले गेले. प्रत्यक्षात एकाही व्यक्तीचे नागरिकत्व कायद्याने हिरावले गेले नाहीय.’
प्रधानमंत्री जी कोई सो रहा हो उसे जगाया जा सकता है, जिसे ग़लतफ़हमी हो उसे समझाया जा सकता है मगर जो सोने की ऐक्टिंग करे, नासमझने की ऐक्टिंग करे उसे आपके समझाने से क्या फ़र्क़ पड़ेगा? ये वही आतंकी हैं CAA से एक भी इंसान की सिटिज़ेन्शिप नहीं गयी मगर इन्होंने ख़ून की नदियाँ बहा दी. https://t.co/ni4G6pMmc3
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 20, 2020
यावरून आता कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगना राणावत आणि भाजपला चांगलच फैलावर घेतलं आहे. ‘आता कंगना राणावत शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली. मोदी सरकार व भाजपच्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळे भाजपाची ही झांसेकी रानी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा व कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत. अस ट्विट करत सचिन सावंत यांनी प्रहार केला आहे’.
आता @KanganaTeam शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली. मोदी सरकार व @BJP4Maharashtra च्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळे भाजपाची ही झांसेकी रानी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा व कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 20, 2020
महत्वाच्या बातम्या
- लोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन
- कृषी विधेयकामुळे कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळेल- राधाकृष्ण विखे
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या संप पुकरण्यावर येणार बंधनं
- किमान निर्यात शुल्क आकारून कांदा निर्यातीस परवानगी द्यावी- सुजय विखे
- संदीप देशपांडेंनी केला लोकल प्रवास; मनसेकडून सविनय कायदेभंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

