Share

तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार

Published On: 

सातारा : खटाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसनवीर कारखान्याच्या अवस्थेवर भाष्य केले.  ‘जिल्हा बँक निवडणुकीचे निर्णय जिल्ह्यातील स्थानिक नेतेच घेतील’, अशी ग्वाहीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

किसनवीर कारखान्याची आज काय अवस्था आहे? ते पण वरून म्हणत असतील की कशाला माझं नाव दिलं आणि कारखान्याची वाट लावली. अरे जेव्हा मोठ्या लोकांची नावे संस्थांना देता तेव्हा त्यांच्या नावाला साजेसे काम तुम्हाला करता आले पाहिजे. नाव अगदी मोठे प्रतापगड आहे, पण त्याही कारखान्याची काय अवस्था झालीय? ज्यांच्यात धमक आहे त्यांनी कारखाने घेऊन चालवून दाखवावेत. विनाकारण काम करणार्‍यांची बदनामी करत बसू नका, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटाव येथे केली.

एखादया निवडणुकीत जनतेने एकदा निवडून दिले तर काम करावे लागते तेव्हा जनता दुसर्‍यांदा निवडून देते. कोरोना काळात आम्ही विकासकामे थांबली तरी चालतील पण माणसांचा जीव वाचला पाहिजे, अशी भूमिका घेत पहिल्या व दुसर्‍या लाटेविरुद्ध लढलो. गरजेच्या सर्व खबरदार्‍या घेतल्या. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे खटावच्या वैभवात भर पडली असून राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्यावत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून त्यांना चांगला स्टाफ मिळावा याकडे देखील लक्ष्य देत आहोत, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

यापुढच्या काळात सातारच्या नागरिकांना उपचारासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. यासाठी प्रयत्न करणार आहोत. जिहे कटापूर योजनेला मान्यता ही आमच्याच काळात मिळाली असून अंतिम टप्यातील काम देखील आमच्याच काळात पूर्ण होत आहे. दिवाळीपूर्वी राज्यातील रस्त्यावरील सर्व खड्डे मुजवून घेण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

जिल्हा बँकेला राज्यातील चांगली बँक म्हणून पाहिले जाते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असून शेवटी मतदार ज्यांच्या पाठीशी आहेत त्यांना संधी मिळेल. बँक चांगली चालवण्यासाठी ती चांगल्या लोकांच्या हाती राहिली पाहिजे. येणार्‍या काळात नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत लोकांच्या मध्ये राहून चांगले काम करणार्‍याला उमेदवारी दिली जाईल, असे अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!