🕒 1 min read
मुंबई: लखनऊ येथील लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने काल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडले. या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. तर यावरूनच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाना साधत संताप व्यक्त केला आहे.
ही काय तानाशाही आहे काय? असा सवाल करत अन्नदाताच्या अंगावर गाडी चालवून त्यांचे जिव घेणे ही तर भारतीय जनता पक्षाची गुंडागर्दीच झाली. अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. तर आता शेतकरी हा भाजप ला धडा शिकवणारच.असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.
ही काय तानाशाही आहे काय?
अन्नदाता याच्या अंगावर गाडी चालवून त्यांचे जिव घेणे ही तर भारतीय जनता पक्षाची गुंडागर्दीच झाली.
आता शेतकरी हा भाजप ला धडा शिकवणारच. https://t.co/735KYR6zaX
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 3, 2021
दरम्यान याठिकाणी प्रशासनाने 144 कलम लागू केलं असून विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून अटकाव करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरमध्ये उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या
- ‘शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळलेय, सुलतानी संकट टाळा’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
