Share

‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शिवसेना नेते सुभाष साबणे यांनी काँग्रेसनेते तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. अशोक चव्हाण यांनी नांदेडातील शिवसेना संपविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. तसेच माझ्या कार्यकर्त्याला बुटाने मारल्याचा आरोपही चव्हाणांवर केला आहे. यावेळी शिवसेनेच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

साबणे यांना भाजपातर्फे देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून तिकीट मिळणार आहे. साबणे यांनी नुकतीच फडणवीसांची भेट घेत आपल्या व्यथा सांगत भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

यावेळी साबणे म्हणाले, ‘मी १९९४ पासून आतापर्यंत इतके वर्ष शिवसेना वाढवली आज अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. मी शिवसेनेवर नाराज नाही. परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांच्यामुळे शिवसेनेला धोका आहे. म्हणूनच शिवसेना वाढत नाही असा आरोप करत साबणे शिवसेनेची आठवण सांगताना म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप प्रेम दिले आहे, जे मागितले ते दिलं उद्धव साहेबांनी. आज शिवसेना सोडताना खूप वाईट वाटत आहे. अशी भावना साबणे यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, आयुष्यात जय पराजय होत रहातो, पण माझ्या कार्यकर्त्याला बुटाने मारण्याचा जो प्रकार झाला तो मनाला वेदना देऊन गेला. राज्यात काँग्रेस संपली होती उद्धव साहेबांमुळे तुम्ही सत्तेवर आलात आणि तुम्ही आम्हाला विसरता, असा प्रश्नही साबणे यांनी अशोक चव्हाणांना केला. तसेच अशोक चव्हाण शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, माझ्यासारख्या अनेकांची हीच स्थिती आहे.

या महाविकास आघाडीतून बाहेर यावे अशी अनेक लोकांची इच्छा आहे, आमदार आणि खासदारांचीही हीच इच्छा आहे. मी जर सहन केले असते तर माझ्यावर काँग्रेसला मत मागण्याची वेळ आली असती. आज पंजाला मतदान द्या आसे म्हणायचे मग २०२४ मध्ये कुणाला मत द्या म्हणून सांगायचे, असेही साबणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!