मुंबई: लखनऊ येथील लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने काल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडले. या घटनेत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे. तर यावरूनच माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी शेतकऱ्यांना मारण्याची धमकी दिली होती.आणि ४ शेतकऱ्यांना मारून गृह राज्यमंत्री किती प्रमाणात जाऊ शकतात हे त्यांच्या मुलाने सिद्ध केले आहे. नरेंद्र मोदीजी तुमचे सरकार आणि सरकारचे मंत्री शेतकरी अनुकूल आहेत की तालिबानी? असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.
केंद्रीय ग्रह राज्य मंत्री अजय मिश्रा ने किसानोंको जान से मारने कि धमकी दि थी और उनके बेटेने ४ किसानों को कुछलकर जान से मारनेसे ये साबित कर दिया कि गृहराज्यमंत्री किस हद तक जा सकते है! @narendramodi जी क्या आपकी सरकार और सरकार के मंत्री किसान हितैशी है या तालिबानी ! पुछता है भारत
— Raju Shetti (@rajushetti) October 3, 2021
दरम्यान याठिकाणी प्रशासनाने 144 कलम लागू केलं असून विरोधी पक्ष नेत्यांना त्या ठिकाणी जाण्यापासून अटकाव करण्यात येत आहे. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांना पोलिसांनी तेथे जाण्यास रोखले आहे. तर दुसरीकडे आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी घेतली आहे. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘..ही तानाशाही आहे काय?’ ‘त्या’ घटनेवरून कॉंग्रेसचा संताप
- केंद्रीय भाजप मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले, परिसरात जमावबंदी लागू
- आर्यन खानच्या अटकेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे; शेकापच्या रमेश मोरेंची टीका


