Share

IPL 2023 | गुजरात टायटन्ससाठी न खेळता कोलकत्ता नाईट रायडर्ससाठी खेळणार ‘हे’ दोन खेळाडू

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आज टी 20 विश्वचषक (T20 World Cup) सामन्यामध्ये इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakisthan) या सामन्यांमध्ये अंतिम सामना झाल्यानंतर क्रिकेटच्या चाहत्यांच्या नजरा आयपीएल 2023 (IPL 2023) कडे वळणार आहे. तर, आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपले रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व फ्रेंचाईजींनी आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शनचे नियोजन सुरू केले आहे.

दरम्यान, आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी गुजरात टायटन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यामध्ये एक मोठा व्यापार झाला आहे. आयपीएल 2023 मध्ये गुजरात मधील लॉकी फर्ग्युसन आणि रहमानउल्ला गुरबाज हे दोन खेळाडू कोलकत्ता नाईट रायडर्स या संघामध्ये दिसणार आहे.

कोलकत्ता नाईट रायडर्सने आयपीएल 2023 मध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याला गुजरात टायटन्स कडून खरेदी केले आहे. लॉकी फर्ग्युसन याने आयपीएल 2022 मधून गुजरात टायटनसाठी तेरा सामने खेळले होते. दरम्यान त्याने या सामन्यांमध्ये बारा विकेट घेतले होते. आयपीएल 2019 ते 2022 पर्यंत लॉकी फर्ग्युसन हा कोलकत्ता नाईट रायडर्स भाग होता. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये न्यूझीलंडच्या या खेळाडूला गुजरात टायटन्सने 10 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.

त्याचबरोबर कोलकत्ता नाईट रायडर्सने अफगाणिस्तानचा विकेटकिपर आणि फलंदाज रहमानउल्ला गुरबाजला देखील गुजरात टायटन्सकडून खरेदी केले आहे. गुरुवार गेल्यावर्षी गुजरात टायटन्स या संघांमध्ये इंग्लंड फलंदाज जेसन रॉयच्या जागी निवडण्यात आला होता. परंतु मागच्या सीझनमध्ये त्याला एकही खेळता आला नाही.

तर, दुसरीकडे गुरबाज ने टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीचा नमुना सादर केला आहे. ज्यामुळे कोलकत्ता नाईट रायडर्सने त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2023 मध्ये तो आपला परफॉर्मन्स दाखवेल, हे बघणे उत्सुकतेचे राहील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!