🕒 1 min read
मेलबर्न : आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयसीसी (ICC) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) चा अंतिम सामना पार पडणार आहे. या अंतिम सामन्यांमध्ये इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakisthan) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. तर या सामन्याआधी इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.
टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत अंतिम सामन्यातील इंग्लंड संघ
जोस बटलर (विकेटकीपर/सी), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करण, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद.
टी 20 विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यातील पाकिस्तान संघ
बाबर आझम (क), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन आफरी
दरम्यान, जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी दुसऱ्या विजेतेपदावर दोन्ही संघाची नजर आहे. कारण पाकिस्तान संघाने 2019 मध्ये जेतेपद पटकावले होते तर एका वर्षानंतर लगेचच इंग्लंडने ट्रॉफी जिंकली होती. तर, दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडने भारताला दहा गडी राखून पराभूत केले. इंग्लंडच्या जोस बटलर आणि अलेक्स हेल्स या दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडला जेतेपदाकडे नेले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
