Share

Sushma Andhare | शिंदे गटाचा मोठा डाव! सुषमा अंधारे यांचे विभक्त पती करणार शिंदे गटात प्रवेश

Published On: 

Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अतिशय कमी वेळात त्यांचं चांगलच नाव कमवलं आहे. सुषमा अंधारे यांनी नेहमी शिंदे गटाला धारेवर धरत टीकास्त्र सोडलं आहे. अशातच शिंदे गटाने मोठा डाव खेळला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे अडसरकर (Vaijnath Waghmare Adsarkar) यांचा आज एकनाथ शिंदे गटात प्रवेश होणार आहे.

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे. याच कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मात्र, वाघमारे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने सुषमा अंधारे यांची डोकेदुखी वाढवल्याचं सांगितलं जात आहे.

सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनी उपनेत्या असं पद दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी या संधीचं सोनं करत अल्पावधीतच पक्षात आणि राज्यात आपली छाप उमटवली. एवढेच नव्हे तर आपल्या अचूक आणि अभ्यासपूर्ण विधानांनी विरोधकांना सळो की पळो करून सोडलं. एवढंच नाही तर अंधारे यांच्या रडारवर शिंदे गट आहे. त्या शिंदे गटावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्यांनी शिंदे गटांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन थेट हल्लाबोल केला.

दरम्यान, वाघमारे यांच्या शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर सुषमा अंधारे आणखीन आक्रमक होतील की बॅकफूटवर जातील हे पाहणं महत्वाचं राहिल.

महत्वाच्या बतम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!