Share

रोहितसह ‘हे’ खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून होऊ शकतात बाहेर

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला दिवस-रात्र सामना भारताने १० विकेट्सने जिंकला. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. ही चौथी कसोटी टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे. ही मालिका संपल्यानंतर या दोन संघात १२ मार्च पासून ५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर २३ मार्चपासून पुण्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या वनडे मालिकेतून भारताचे ३ मुख्य खेळाडू संघाबाहेर होऊ शकतात.

माध्यमांतील वृत्तानुसार वनडे मालिकेसाठी भारताचे रोहित शर्मा, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांना विश्रांती देण्यात येऊ शकते. हे तिघे ही आयपीएल २०२० स्पर्धेपासून सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. तसेच हे तिघेही सतत बायो बबलमध्ये राहून क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे त्यांना संघ व्यवस्थापन विश्रांती देण्याचा विचार करत आहे.

भारतीय खेळाडू आयपीएल २०२० पासून सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. आयपीएलनंतर भारतीय संघ जवळपास तीन महिन्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला होता. हा दौरा संपल्यानंतर लगेचच इंग्लंड संघ भारतात खेळण्यासाठी आला. तसेच इंग्लंड विरुद्ध मालिका संपल्यानंतर आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सतत बायो बबलमध्ये राहिल्यामुळे खेळाडूंना मानसिक तणाव येऊ शकतो आणि खेळाडूंमध्ये थकवा दिसून येऊ शकतो. त्यामुळे खेळाडूंना विश्रांती मिळणे देखील गरचेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!