जालना : पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पीएचडी करणाऱ्या जाफ्राबाद तालुक्यातील तरुणाचा खून समलैंगिक संबंधांतून झाल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी हिंगोलीच्या रविराज राजकुमार क्षीरसागर (२४, मु.लाक, ता.औंढा,) या तरुणाला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
जाफ्राबाद तालुक्यातील जानेफळ येथील रहिवसी असलेला सुदर्शन बाबुराव पंडित या तीस वर्षीय तरूणाचा पुण्यात तीन दिवसांपू्र्वी खून झाला होता. सुदर्शन शिक्षणासाठी पुण्यातील सुतारवाडी भागात पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. काही दिवसांपूर्वी एका डेटिंग साइटच्या माध्यमातून आरोपी रविराज आणि सुदर्शन यांची ओळख झाली. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद झाले. आरोपीने शनिवारी रात्री सुदर्शनला सूस खिंडीत बोलावले आणि तिथे त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून केला. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी रविराजचे नाव समोर आले. पोलिस तपास करत असतानाच रविराजने राहत्या घरी सुसाइड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे आई-वडील घरी आले असता त्यांना तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याला वारजे येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
सुदर्शन हा कोथरुड परिसरात ५ मित्रांसोबत राहत होता. मित्रांकडे चौकशी केली तेव्हा गेल्या काही महिन्यांपासून तो मोबाईलवर खूप बोलत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर रविराजचे नाव समोर आले. रविराजचे २ वर्षांपूर्वी लग्न होऊनही सुदर्शनसोबत संबंध होते. ते इतके वाढले की रविराजचे प्रकरण पत्नीसोबत घटस्फोटापर्यंत गेले.
सुदर्शनचे लग्न ठरल्याने मागील १५ दिवसांपासून वाद
आठ महिन्यापूंर्वी दोघांची डेटिंग साइटवरून एलग्न ठरल्याने मागील १५ दिवसांपासून त्यांच्यात ओळख झाली आणि तिचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. परंतु सुदर्शन पंडित याचे लग्न ठरल्याने मागील १५ दिवसांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. पंडित याचे लग्न झाल्यास तो आपल्यापासून लांब जाईल या मानसिकतेतून रविराजने त्याचा खून केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात ६४७ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; ८ बाधितांचा मृत्यू
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- अर्ध्यावरती डाव मोडला.. कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
- मोबाइल टॉवरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक


