🕒 1 min read
इंग्लंड : भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचा विश्वास आहे की, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी संघाचा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा महत्त्वाची भूमिका बजावेल. जडेजाला पहिल्या चार कसोटींमध्ये रविचंद्रन अश्विनच्या जागी स्थान देण्यात आले आहे. पण तो आतापर्यंत फार प्रभावी कामगिरी करू शकला नाही. मात्र, भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे म्हणणे आहे की, अंतिम दिवशी फिरकीपटूची भूमिका निर्णायक असेल. इंग्लंड संघाचा फिरकीपटू मोईन अलीनेही हेच सांगितले आहे.
शेवटच्या दिवशी जडेजा महत्वाची भूमिका बजावेल कारण पाचव्या दिवशी खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकते. जडेजा नियंत्रणाने गोलंदाजी करतो, असं विक्रम राठोडने म्हंटले आहे. त्याने शेवटच्या 5-6 षटकांत बऱ्याच संधी निर्माण केल्या. पाचव्या दिवशी नशिबाने त्याला साथ दिली तर तो विकेट मिळवू शकेल. म्हणून जडेजा महत्त्वाची भूमिका बजावेल.
दुसरीकडे, इंग्लंडचा उपकर्णधार मोईन अलीने म्हटले आहे की, डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका असेल. इंग्लंडला चौथी कसोटी जिंकण्यासाठी 368 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, त्यापैकी 77 धावा संघाने केल्या आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना एकही विकेट मिळाली नाही. अशा परिस्थितीत पाचव्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा असणार आहे, पण मोईन अलीने जडेजाला मोठा धोका असल्याचे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना ईडीने लूक आऊट नोटीस बजावल्यानंतर फडणवीसांनी दिला ‘हा’ सल्ला
- …म्हणून संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात भाजपने दाखल केली तक्रार
- जावेद अख्तर यांनी केलेले वक्तव्य तालिबानमध्ये केले असते तर चौकात फटके मारले असते- सुधीर मूनगंटीवार
- ‘संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागलेत’; आशिष शेलार यांचा खोचक टोला
- सण-उत्सव नंतरही साजरे करू…हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल – मुख्यमंत्री ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
