Share

Top Ten Cars | आपल्या स्पीडने सगळ्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या ‘या’ आहेत जगातील टॉप टेन स्पीडी कार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: वेग हा माणसाच्या औत्सुक्याचा आणि प्रचंड आवडीचा विषय आहे. वेगवान असणारी प्रत्येक गोष्ट माणसाला आकर्षित करत असते. प्रचंड वेगाने धावणाऱ्या कार तर सर्वांना प्रिय असतात. आपल्या आयुष्यात एकतरी वेगवान धावणारी  गाडी असावी असं प्रत्येकाचे स्वप्न असते. अशाच काही  वेगवान गाड्यांबद्दल जाणून घेवूयात.

जगातील सर्वाधिक वेगवान कार 

SSC TUATARA

ही गाडी आपल्या वेगासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या गाडीचा सर्वाधिक वेग हा 455 किमी.प्रती तास नोंदवण्यात आला आहे. वेग धारण करण्यासाठी या गाडीत अत्यंत कमी वेळात वेग घेणारे इंधन आहे. 59 एल ट्विन टर्बोचार्जड इंजिन हे 1350 हाॅर्स पाॅवर आणि 1750 हाॅर्स पाॅवर असा वेग घेते.

KOENIGSEGG AGERA RS 

447 किमी प्रती तास वेगाने धावणारी ही गाडी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगवान कार आहे. 5.0 ट्विन इंजिन या कारची क्षमता वाढवण्याचे काम करते. जगातील फक्त 11 लोकांकडे ही कार आहे. व्ही 8 इंजिन या कारला 1160 हाॅर्स पाॅवर इतकी क्षमता देते.

HENNESSEY VENOM GT

435 KMPH इतका वेग असलेली ही कार जगातील तिसरी सर्वात वेगवान कार म्हणून परिचीत आहे. 7.0  एल व्ही8 इंजिन या कारला 1244 हाॅर्स पाॅवर इतकी क्षमता प्रदान करते. ही कार अवघ्या काही क्षणांमध्ये वेगाची मर्यादा वाढवण्यास सक्षम आहे.

BUGATTI CHIRON

420 किमी प्रती तास वेगाने धावणारी ही कार जगातील सर्वात वेगाने धावणारी चौथ्या क्रमांकाची कार आहे. 8.0 एल क्वाड टर्बो क्षमतेचं इंजिन या कारची क्षमता वाढवण्याचे काम करते. या कारला इंजिन 1479 हाॅर्स पाॅवर इतक्या क्षमतेने उर्जा पुरवते.

BUGATTI VYRON SUPER SPORT

415-430 या वेगाने धावणारी ही कार खूप लोकप्रिय आहे. जागतिक बाजारात या गाडीला क्रिडा प्रकारात देखील लोकप्रिय समजले जाते. 8.0  एल क्वाड टर्बो क्षमतेचं इंजिन या कारची क्षमता वाढवण्याचे काम करते. या कारला इंजिन 1200 हाॅर्स पाॅवर इतक्या क्षमतेने उर्जा पुरवते.

SSC ULTIMATE AERO TT

412 या वेगाने धावणारी ही कार अनेक विक्रम आपल्या नावावर करण्यात यशस्वी झाली आहे. ट्विन टर्बो व्ही8 इंजिन या गाडीच्या क्षमतेत अधिक वाढ करते. 1287 हाॅर्स पाॅवर इतकी क्षमता हे इंजिन या कारला देते.

KOENIGSEGG CCXR

400 या वेगाने धावणारी ही कार सुरक्षित आणि शक्तिशाली इंजिनचा समावेश असणारी गाडी आहे.

SALEEN S7 TWIN TURBO 

339 इतक्या वेगाने धावणारी ही कार अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. 750 हाॅर्स पाॅवर इतकी क्षमता या कारमधील इंजिन तयार करते.

MCLAREN F1

1993 मध्ये बाजारात दाखल झालेल्या या कारची अधिकतर वेग क्षमता ही 386 आहे. कारमधील शक्तिशाली इंजिन कारला 618 हाॅर्स पाॅवरने क्षमता देते.

PAGANI HUAYRA 

380 किमि प्रति तास इतक्या वेगाने धावणारी ही कार चांगल्या इंजिनचा वापर करून बनवण्यात आली आहे. 6.0 ट्विन टर्बो व्ही12 इंजिन गाडीला अधिक वेगवान बनवते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Cars And Bike

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या