मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परीषद सुरु झाली आहे. महाड कोर्टाने जामीन दिल्यानंतर राणेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारत सभ्य भाषेत टीका केली.
राणे म्हणाले, या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरु केला. त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा क्राईम होतो? काय पत्रकारिता आहे? आम्ही पाहिलीच नाही. आक्षेप नाही. शिवसेनेच्या नेत्याने असे शब्द उच्चारले नाहीत?” असा सवाल नारायण राणे यांनी केला.
‘शिवसेना वाढली त्यात आमचाही मोठा सहभाग आहे. आत्ता जे अपशब्द वापरतायेत त्यावेळी ते कुठेही नव्हते. आमचा बंदोबस्त करायचा असेल तर करू द्या. पोलिसांनी सगळं पाहावं. चिपळूणमध्ये १७ माणसं होती तिथं प्रचंड गर्दी असं सांगितले. त्यापुढे गेलो तर १३ माणसं. आमच्या घरावर किती माणसं आली मोजली नाही. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे करायचं ते केले. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत का? तुम्ही कुणीही माझं काही करू शकत नाही. तुम्हा सगळ्यांना मी पुरून उरलोय अशा संतप्त भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केल्या आहेत.
मी असं काय बोललो ज्यानं राग आला. भूतकाळात एखादी गोष्ट घडल्यानंतर त्यावर गुन्हा कसा होतो? १ ऑगस्टला बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं उद्घाटन होतं. शिवसेना नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत का? देशाबद्दल अभिमान आहे म्हणून ते संतापाने बोललो. शिवसेना भवनाबद्दल कुणी काही बोललं तर थोबाड फोडा हे आदेश नाहीत का? हा योगी आहे की ढोंगी, चप्पलाने मारले पाहिजे, एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चप्पलाने मारलं हे शब्द वापरलेले चालतात? केंद्रीय मंत्री अमित शाह यांना निर्लज्ज असा शब्द वापरला ते चालतं का? असा सवाल त्यांनी विचारला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार’, नारायण राणेंचे ट्वीट
- नाणेफेक जिंकत विराटने संपवला ‘तो’ इंग्लंडमधील दुष्काळ
- ‘सैराट’ फेम आर्चीच्या हटके लुकने वेधले चाहत्यांचे लक्ष
- हेंडिग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- ‘भोक तुमच्या फुग्याला पडलंय राऊतसाहेब…’ ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला


