Share

झाले बहू होतील बहू परंतु लतादीदी सम त्याच, लतादीदी पुन्हा होणे नाही-सचिन सावंत

Published On: 

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज रविवार दि. ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानं ८ जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांना कोरोनासोबतच न्युमोनियाची लागण झाली होती. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत प्रभूकुंज इथे ठेवण्यात येणार आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

सचिन सावंत शोकभावना व्यक्त करताना म्हणाले, ‘लतादीदी पुन्हा होणे नाही. झाले बहू होतील बहू परंतु लतादीदी सम त्याच! त्या शिखरावर कोणी पोहोचणे नाही. त्या नसल्या तरी त्यांच्या गाण्यांतून दीदी अमर आहेत. हजारो वर्षे त्यांचा आवाज या भूतलावर राहिल. एकमेव गानकोकिळेला, भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व मानाचा मुजरा!’ असे सचिन सावंत म्हणाले.

लता मंगेशकर यांचं मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात आज सकाळी ८.१२ वाजता निधन झालं. दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत प्रभूकुंज इथं लता दीदींचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!