🕒 1 min read
मुंबई : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलेली आहे. भारतात परतल्यानंतर सर्वांचेच उत्साहात स्वागत झाले आहे. भारतीय संघाच्या या विजयानंतर विविध स्तरातून कौतुक केलं जात आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी बरेच जण विमानतळावर उपस्थित होते. परंतु शिवसेनेचे एकही मंत्री टीम इंडियाच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित नव्हते. यावरूनच भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा धुव्वा उडवणाऱ्या मराठमोळ्या अजिंक्य राहणेचे आज सकाळी 8.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. परंतु सतत मराठीची टिमकी वाजवणाऱ्या ठाकरे सरकारचा एकही मंत्री त्याच्या स्वागतासाठी नव्हता.. कारण… एकच लक्ष्य टक्केवारी.’
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा धुव्वा उडवणाऱ्या मराठमोळ्या अजिंक्य राहणेचे आज सकाळी 8.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. परंतु सतत मराठीची टिमकी वाजवणाऱ्या ठाकरे सरकारचा एकही मंत्री त्याच्या स्वागतासाठी नव्हता..
कारण… एकच लक्ष्य टक्केवारी pic.twitter.com/TLd7HT8zwn— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 21, 2021
दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचे वाघ पोहचले बेळगाव सीमेवर, बंदोबस्त तोडून भगवा फडकवण्यावर ठाम !
- ‘मै तेरा नोबिता, तू मेरी शिजुका’ अखेर शिजुका झाली नोबिताची
- उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून ‘त्या’ उड्डाणपुलाचं नामकरण
- अधिकारी लोंढे यांच्यामुळे पूर्वीही एका ग्रामसेवकाने केली होती आत्महत्या
- घरी येणार असेल तर चांगले कपडे घालूनच ये; रहाणेच्या बायकोचा ‘स्वीट’ सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
