मुंबई : ‘बिग बॉस’ मध्ये चालू असलेल्या खेळादरम्यान निक्की जान सानू सोबत मराठी मध्ये सवांद साधत होती. त्यावेळी जानने तिला, ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हंटले. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला.
यावरच मनसेने आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. आणि जान सानू ला या ‘शो’ मधून काढून टाकण्यास देखील सांगितले. जान सानूच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार आक्रोश पाहायला मिळाला.
या वादानंतर कलर्स टीव्ही ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून माफी मागितली. “कलर्स टीव्हीवर मंगळवारी, 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आलेल्या बिग बॉसच्या एपिसोडमधील मराठी भाषेवरील टिप्पणीसाठी आम्ही माफी मागतो. महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.” – कलर्स टीव्ही.
नंतर ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली. जानने मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली.
यावेळी जान कुमार सानू म्हणाला की, मी नकळत एक चूक केली त्यामुळे मराठी माणसांच्या दुखावल्या, मराठी माणसांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी यासाठी माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही असं त्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- अनिल गोटे यांनी पाडले भाजपला खिंडार,धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…
- जान सानू प्रकरण: चौफेर टीकेनंतर अखेर ‘कलर्स’ने मागितली महाराष्ट्राची माफी
- स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार
- ‘भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा’
- जनतेचा सेवक असल्याने जागा हडप करणाऱ्यांना माफ करणार नाही- लहू कानडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

