🕒 1 min read
मुंबई : ‘बिग बॉस’ मध्ये चालू असलेल्या खेळादरम्यान निक्की, जान सानू सोबत मराठी मध्ये सवांद साधत होती. त्यावेळी जानने तिला, ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हंटले. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला.
यावरच आता मनसेनं आक्रमक भूमिका घेत जानला थेट इशारा दिला आहे. ‘जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,’ अशा शब्दांत खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात राहून देखील प्रसिद्ध गायक कुमार सानूच्या मुलाने असे बोलणे कितपत योग्य आहे असा सवाल चाहत्यांनी उभा केला आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार आक्रोश पाहायला मिळत आहे.
या वादानंतर आता कलर्स टीव्ही ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याना पत्र लिहून माफी मागितली आहे. “कलर्स टीव्हीवर मंगळवारी, 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आलेल्या बिग बॉसच्या एपिसोडमधील मराठी भाषेवरील टिप्पणीसाठी आम्ही माफी मागतो. महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.” – कलर्स टीव्ही.

महत्वाच्या बातम्या
- दिलासादायक : राज्यात आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोनाबाधित बरे झाले
- आयकर विभागाची दिल्ली,एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंडमध्ये मोठी कारवाई
- स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार
- ‘भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा’
- जनतेचा सेवक असल्याने जागा हडप करणाऱ्यांना माफ करणार नाही- लहू कानडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
