Share

अनिल गोटे यांनी पाडले भाजपला खिंडार,धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

Published On: 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

धुळे जिल्ह्यातील भाजपचे भरत पाटील, भास्कर पाटील, अनंतराव पाटील, बाळू पाटील, कपिल दामोदर, माजी संस्थापक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहर उपाध्यक्ष दिलीप पाटील, राजेंद्र गायकवाड यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, धुळे शहराध्यक्ष विजय वाघ, संयोजक प्रशांत भदाणे उपस्थित होते.

दरम्यान, भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी सीमोल्लंघन करत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्यावर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे बळ निश्चितच वाढणार आहे.अनेक समीकरणं आता बदलतील असा अंदाज असतांना एक चर्चा सुरु झाली आहे,की आता एकनाथ खडसे आणि अनिल गोटे मिळून महानगरपालिका आणि नगरपालिका सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

सध्या धुळे जिल्ह्यात धुळे महानगरपालिका, दोंडाईचा नगरपालिका आणि शिरपूर नगरपालिका येथे भाजपची एकहाती सत्ता आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर करण्यासाठी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे हे एकत्र येऊन काम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!