Share

जनतेचा सेवक असल्याने जागा हडप करणाऱ्यांना माफ करणार नाही- लहू कानडे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकर्‍यांविरोधी काळे कायदे करून शेतकर्‍यांचे सर्व आधिकार या सरकारने हिरावून घेतले आहेत. तसेच मी प्रथम जनतेचा सेवक आहे.

सत्तेच्या माध्यमातून ज्यांनी सरकारी जागा हडप केल्या त्यांना मी त्या पचवू देणार नाही, असा परखड इशारा आ.लहु कानडे यांनी दिला आहे. टाकळीभान येथे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या सह्यांच्या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

आ.लहू कानडे पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने शेतकरी विरोधी भूमिका घेतलेल्या केंद्रातील सरकारचा निषेध नोंदवत केंद्राने केलेले कायदे रद्द करावेत म्हणून राज्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे. राज्यात या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यावेळी जिल्ह्यातील भाजपाच्या मुख्य नेत्यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या कार्यपध्दतीवर प्रखर टीका केली.

यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असल्याने शेतकर्‍यांना मारक ठरणारा काळा कायदा त्यांनी केला आहे. त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करीत आहे. यावेळी राजेंद्र कोकणे, भारत भवार, भास्कर कोकणे, श्रीधर गाडे, विलास दाभाडे, प्रा.विजय बोर्डे, बाबासाहेब तनपुरे, गजानन कोकणे, प्रकाश दाभाडे, महेंद्र संत, मोहन रणनवरे, तुषार दाभाडे, संदीप जावळे, शंकर पवार, शरद रणनवरे, सुनील दाभाडे, विष्णूपंत पटारे, भैय्या पठाण, गोरख दाभाडे, बंडुतात्या कोकणे, गणेश गायकवाड, सर्जेराव कोकणे, बाळासाहेब दुधाळे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!