नवी दिल्ली- घराणेशाहीच्या भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. काही राज्यांमध्ये राजकीय संस्कृतीचा हा भाग बनला असून तो देशाला वाळवीसारखा पोखरत चालला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं यानिमित्त नवी दिल्लीत, भ्रष्टाचार प्रतिबंध आणि दक्षता या विषयावर तीन दिवसांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली असून तिचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं. त्यावेळी ते बोलत होते.भारतासारख्या गरीब देशात भ्रष्टाचाराला स्थान असता कामा नये, भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून आपण सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा असं मोदी यांनी म्हटलं आहे.
हजारो कोटींचे घोटाळे, बनावट कंपन्यांचे जाळे, कर चुकवेगिरी हे सर्व गैरप्रकार वर्षानुवर्षे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. २०१४ मध्ये देशाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वात मोठे आव्हान हे वातावरण बदलण्याचे होते. गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्सने देश पुढे गेला आहे. २०१४ पासून आतापर्यंत प्रशासकीय, बँकिंग व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, शेती, कामगार या सर्व क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या आहेत, असं मोदी म्हणाले. लोकांनीच भ्रष्टाचार संपवायला हवा, तसच भ्रष्टाचाराविरोधात लढाई मजबूत करायला हवी, त्याच प्रमाणे भ्रष्टाचारावर प्रतिबंध घालण्यासाठी निर्माण केलेल्या विविध संस्थांमध्ये ताळमेळ असायला हवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
भ्रष्टाचारामुळे विकासाला खीळ बसते, म्हणूनच विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था मजबूत असायला हवी आणि त्यादृष्टीनं भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी एक रणनीती आखायला हवी असं ते म्हणाले. काळा पैसा रोखण्यासाठी समिती स्थापन करून भ्रष्टाचाराविरोधातली आमची वचनबद्धता आम्ही दाखवून दिली त्यामुळे आता विविध घोटाळ्यांचा जमाना तसच नियुक्त्यांसाठी शिफारशी करण्याचा जमाना आता मागे पडला आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे गरिबांचा पैसा, आता त्यांना मिळू लागला आहे असंही मोदी यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला गेला आहे’
- आयकर विभागाची दिल्ली,एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंडमध्ये मोठी कारवाई
- कुमार सानुच्या पोरानं अक्कल ठेवली गहाण, म्हणे मराठीची लाज वाटते…
- बिहारमध्ये विधानसभा निवडणुक : पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
- भाजपाला नितीशकुमार हे पुन्हा धोका देतील; चिराग पासवान यांनी केले भाकीत


