मुंबई : आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून गुरुवारी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे टाकले आहेत. काल सकाळपासून आयकर विभागाची पथके यावर तपास करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यावर भाष्य केले करत या कारवाया म्हणजे सूडबुद्धीचं राजकारण आहे. मला भाजपने ईडीची नोटीस पाठवली आणि सबंध महाराष्ट्राने भाजपला येडी ठरवली, असं शरद पवार म्हणाले होते. त्यावर आता भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
एवढा आत्मविश्वास आहे मग पक्षात थयथयाट कशाला?, असा सवाल भातखळकरांनी शरद पवारांना विचारला आहे. पवारांवर आयकर विभागाची कारवाई सुरु झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते, मंत्र्यांनी ही कारवाई सुडबुद्धीने असल्याचे म्हंटले आहे. राष्ट्रवादीचे नेते कोणत्याही कारवायांना घाबरणारे नाहीत, हार मानायला लावत असाल तर लक्षात ठेवा ते अजित पवार आहेत. ते व्याजासकट याचा हिशोब चुकता करतील, असं राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या म्हणाल्या आहेत.
एवढा आत्मविश्वास आहे मग पक्षात इतका थरथराट कशाला? pic.twitter.com/fzkwyzCkHx
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 8, 2021
एकंदरीतच अजित पवारांच्या नातेवाईकांच्या कंपन्या आणि कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर शरद पवारांनी भाजपवर टीका केली. शरद पवारांच्या टीकेल उत्तर देताना भातखळकरांनी त्यांना खोचक सवाल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप; बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- … तर एकही चेंडू न खेळता मुंबई इंडियन्स आयपीएलमधून पडू शकते बाहेर


