Share

पुण्यात नाट्यगृह, पर्यटन स्थळं आणि विद्यापीठं होणार सुरू, काय आहेत नवे नियम?

Published On: 

पुणे : पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. त्यानुसार कोरोना प्रतिबंधीत नियमांमध्ये आणखी सुट देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते आहे. यावेळी अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही दिवसांत टप्प्या टप्प्याने पुण्यातील नाट्यगृह, पर्यटन स्थळं आणि विद्यापीठं सुरू होणार आहेत.

अजित पवारांनी पुणे जिल्ह्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे. यानुसार ‘आता सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहे, मात्र नियमाचे पालन करावं लागेल. 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी सांगितलं. इतकंच नाही तर पुण्यातील हॉटेल आता 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे’, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे.

दर आठवड्याच्या प्रथेप्रमाणे आज बैठक पार पडली. सोमवारपासून खाजगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत. मात्र नियमांचे पालन करावं लागेल. नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी असेल. हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल, असं अजित पवारांनी माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांना दोन डोस बंधनकारक

सोमवारपासून कॉलेज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही डोस घेणं बंधनकारक असेल. ज्यांनी दोन डोस घेतले त्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. असं अजित पवार म्हणाले.

झोपडपट्टी परिसरात लसीकरण कमी होत आहे. पुण्याचा कोरोना दर 2.5 दर आहे. बाधित दर 3 टक्के आला आहे. पहिला डोस घेण्याऱ्यांचे प्रमाण 103 टक्के आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!