🕒 1 min read
सोलापूर : पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून इंधनाची दरवाढ थांबता थांबेना, असंच म्हणायची वेळ आली आहे. कारण, आज पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. या नव्या वाढीसह डिझेल दरवाढीचा आजपर्यंत प्रति लिटरचा सर्वात मोठा आकडा गाठला आहे. डिझेलने एकप्रकारे शतक गाठले असून दिल्लीत आज डिझेलचे दर 99.55 रुपये म्हणजेच 100 रुपये लिटर एवढे झाले आहे. तर, पेट्रोल 109.25 रुपयांवर पोहोचले.
या इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करताना त्यांनी हल्लाबोल केला.
ते म्हणाले, ‘आज सामान्य माणसाच्या दृष्टीने महागाई हा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. असा एकही दिवस जात नाही जेव्हा पेट्रोल-डिझेल दरवाढीची बातमी येत नाही. इंधनाचे दर वाढल्याने दळणवळणाची साधनं महाग होतात आणि त्याचा परिणाम भाजीपाल्यापासून सर्व वस्तूंच्या महागाईवर होतो. याची झळ सामान्य माणसाला बसते.
केंद्रातही लोकशाही पद्धतीने सरकार स्थापन झाले. सत्ता स्थापन झाल्यानंतर त्याचा उपयोग सामान्यांना झाला पाहिजे. पण आपण पाहत आहोत की, ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते लोक सत्तेचा वापर वेगळ्या पद्धतीने करत आहेत.
भाजपची आर्थिक नीती महागाईला निमंत्रण देणारी आहे. अशा राज्यकर्त्यांविरोधात जनमानस निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षाला करावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सामान्य लोकांच्या हितासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे’ असे वक्तव्य पवार यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार; राणेंचा घणाघात
- लवकरचं ‘दूध का दूध पानी का पानी होईल; अजितदादांची प्रतिक्रिया
- ‘आता राष्ट्रवादीवाले बॉलिवूडची पण भांडी घासायला लागले’, निलेश राणेंचा घणाघात
- ‘लखीमपुर घटनेवर मी प्रतिक्रिया दिली या रागातून सत्ताधाऱ्यांनी ‘ती’ कारवाई केली असावी’
- १०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

