Share

“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचा केवळ एक मुख्यमंत्री आणि तोही काँग्रेसमधून आयात केलेला”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या स्थानावर आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानावर आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

https://www.facebook.com/RRPspeaks/photos/a.226136124516804/1356704751459930

याबाबत रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीली आहे. त्यात रोहित पवार म्हणतात, ‘जगातील सर्वांत मोठा पक्ष अशी शेखी मिरवणारा आणि सर्वाधिक १२ राज्यांत मुख्यमंत्री असलेल्या भाजपचा देशांत सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीत पहिल्या दहामध्ये केवळ एक मुख्यमंत्री आहे. तेही काँग्रेसमधून आयात केलेले. यावरुन भाजप खरंच ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे, हे स्पष्ट होतं.’ अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.

देशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इंडिया डुडे आणि वोटर या संस्थेने लोकांच्या मनातील लोकप्रिय नेता जाणून घेण्यासाठी सर्वे केला होता. यात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर असून केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानावर आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!