Share

सत्तार हे सत्तेच्या मागे धावणारे नेते; आज इथे तर उद्या तिथे, डॉ. भागवत कराडांची सणसणीत टिका!

Published On: 

औरंगाबाद: भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosahen Danve) व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड(Dr. Bhagwat Karad) यांनी सोयगाव येथील निवडणुकीत जोरदार प्रयत्न करून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदार बांधवांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले. दानवेंना लवकरच नांगर हाकण्यास पाठवू अशा प्रकारची टीका अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी सोयगाव नगरपंचायत निवडणुकीतील विजयानंतर केली होती. आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सत्तार हे सत्तेच्या मागे धावणारे नेते आहे असे म्हणत त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

सोयगाव मध्ये महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाचा विजय झाला असून या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ जागेवर विजय मिळवत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. दोन राज्यमंत्री असतांनाही आपण भाजपला भुईसपाट केल्याची प्रतिक्रिया सत्तार यांनी यावेळी दिली होती. तसेच रावसाहेब दानवे यांना आपण लवकरच नांगरणीस पाठवू असेही ते म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीदेखील अब्दुल सत्तर यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले अब्दुल सत्तर काय बोलतात हे त्यांच्याही लक्षात राहत नाही. तसेच रावसाहेब दानवे यांना नांगर हाकण्यास पाठवणारा या लोकसभा मतदारसंघात अजून कुणीही नाही. सत्तार हे सत्तेच्या मागे धावणारे नेते आहेत. पुढील निवडणुकीत ते शिवसेनेतच राहतील याची काही शक्यता नाही. त्यामुळे त्यांचे बोलणे आम्ही मनावर घेत नाही. असे कराड म्हणाले.

भाजपने दुसऱ्यांदा गमावली सत्ता

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपली सत्ता गमावली आहे. अब्दुल सत्तार यांनी या ठिकाणी आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा हा मतदारसंघ आहे. मात्र दुसऱ्यांदा याठिकाणी सत्ता मिळवण्यात भाजपला अपयश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!