मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) विजेते रणजित डिसले यांच्या परदेश वारीला हिरवा कंदिल दाखवला आहे. रणजित डिसले गुरुजी यांच्या शिक्षणासाठीच्या रजेचा अर्ज संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी नामंजूर केल्याने मोठे वादंग उठले होते. यामुळे राजकीय वातावरण तापले होते. अखेर वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजी यांच्या रजेचा अर्ज मंजूर केल्याने या वादावर काही प्रमाणात पडदा पडला आहे.
सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक @ranjitdisale जी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 22, 2022
याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड ट्विट करत म्हणाल्या, ‘सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक रणजित डिसलेजी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे.’, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.
डिसले गुरुजी यांना पीएच.डी. साठीची रजा शिक्षणाधिकाऱ्यांनी नाकारल्याचे समोर आले होते. त्यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
सोलापूर येथील एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ‘संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी डिसले गुरुजी यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचावण्यासाठी काय केले? मागील तीन वर्षात त्यांनी शाळेसाठी काय केले? याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कामाची फाईल सादर करण्यास संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्याला सांगितलं आहे. डिसले गुरुजींनी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविला, ही बाब अभिमानास्पद आहे; पण त्यांच्या या कर्तृत्वाचा परितेवाडी शाळेला काय उपयोग झाला, हे तपासावे लागणार आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आम्हाला उपयोग हवा आहे. त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी इतकी मोठी रजा देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करणे परवडणारे नाही’ असं शिक्षणाधिकारी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांची मोठी घोषणा; नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी मंजूर
- …त्यामुळे प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही- प्रियंका गांधी
- “गोव्यातील भाजपमध्ये फुटताय बंडाळीचे फटाके”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- अभिमानास्पद! जम्मू काश्मीरातील मच्छल खोऱ्यात छत्रपती शिवरायांची मूर्तीस्थापना
- “काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

