Share

इथे पैसे दिल्या शिवाय कामेच होत नाहीत; भूमी अभिलेख कार्यालय लाचखोरांचे!

Published On: 

जालना: येथील भूमी अभिलेख कार्यालयातील पर्यवेक्षक भूमापक माधव पांडुरंग ओगले हा लाचेच्या जाळ्यात अडकला आहे. पीआर कार्डवरील नाव दुरुस्त करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारतान अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यालयातील अधिकाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी येत आहेत. इथे पैसे दिल्या शिवाय कामेच होत नाहीत, आशा अनेक तक्रारी आल्या आहेत. चार महिन्यापूर्वी देखील या कार्यालयातील एक अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकला होता.

तक्रारदार हे सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांनी जालना शहरात प्लॉट खरेदी केला होता. त्या वेळी प्लॉटच्या पीआर कार्डवर चुकीच्या नावाची नोंद झाली होती. त्यामुळे पीआर कार्डवरील चुकलेल्या नावाची दुरुस्ती करण्यासाठी १८ डिसेंबर २०२० रोजी त्यांनी जालना येथील पर्यवेक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यानंतर येथील पर्यवेक्षक भूमापक माधव ओगले यांनी पीआर कार्डवरील चुकीच्या नावाच्या दुरुस्तीसाठी २ हजार रुपयांची मागणी केली तसेच प्लॉटच्या मोजणीसाठी ६ हजार रुपये असे एकूण ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी तक्रारदारांकडे केली होती.

एवढ्याशा कामासाठी एवढी मोठी रक्कम देण्यास तक्रारदार इच्छुक नव्हते. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारने थेट जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, माधव ओगले याने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी माधव ओगले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!