औरंगाबाद : धनजंय मुंडेंच्याच बीड जिल्ह्यातील शिरूर कासारचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावरही महिन्याभरापूर्वी औरंगाबादच्या तरुणीने अत्याचाराचे आरोप केले होते. दरम्यान, तांत्रिक तपासात शेख यांच्याविराेधात कुठलाही सबळ पुरावा हाती लागला नसल्याचा औरंगाबाद पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात तक्रारदार महिला व शेख यांच्या संपर्कात त्या दरम्यान आलेल्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
२६ डिसेंबर रोजी २९ वर्षीय पीडितेने सिडको पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यात म्हटल्यानुसार, काही महिन्यांपूर्वी ट्युशनसाठी जागा शोधत असताना तिची मेहबूब शेखसोबत ओळख झाली होती. त्याने मुंबईत नोकरीचे आमिष दाखवून जालना रस्त्यावर रामगिरी परिसरात माझ्यावर कारमध्ये अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ सहायक पाोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तपासकामी लावली. त्यात आतापर्यंत झालेल्या तांत्रिक तपासात तरी महेबूब शेख यांच्याविराेधात अत्याचाराच्या अनुषंगाने काही पुरावे हाती लागले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पीडितेने अत्याचार झाल्याचे सांगितलेल्या दिवशी शेख यांचे मोबाइल लोकेशन देखील घटनास्थळी असल्याचे स्पष्ट होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आणखी पुरावे मिळतात का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
संपर्कातील लोकांचे जबाब
पीडितेचा याप्रकरणी आतापर्यंत तीन वेळेस जवाब नोंदवून झाला आहे. तर मेहबूब यांचा देखील जबाब नोंदवून पूर्ण झाला आहे. पीडितेने ज्या दिवशी अत्याचार झाल्याचे सांगितले त्या दिवशी आपण औरंगबादेत नव्हतो, असा मेहबूब यांनी सांगितलेय. आपण कथित घटनेच्या दिवशी आपल्या गावी असल्याचा दावा त्यांनी केलाय. पोलीस या दाव्याची शहानिशा करत आहेत. महेबूब यांनी आपण कोणासोबत हे सांगितले आहे. त्या व्यक्तींचा जबाब देखील पोलीस नोंदवत आहेत. आतापर्यंत अनेकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची शिक्षा रद्द
- यावर्षी परदेशी प्रमुख पाहुण्यांविना होणार साजरा प्रजासत्ताक दिन…
- ‘वंचित’ म्हणजे संधिसाधू लोकांची आघाडी : प्रा.कवाडे
- मुंडेंवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वत:ला आरशात पाहावे : अमोल कोल्हे
- धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा, तुर्तास राजीनामा नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

