Share

‘वंचित’ म्हणजे संधिसाधू लोकांची आघाडी : प्रा.कवाडे

Published On: 

औरंगाबाद : ‘वंचित बहुजन आघाडीला दलित-वंचितांच्या हक्काची जाणीव असती तर त्यांनी रिपब्लिकन पक्षांनाही सोबत घेतले असते. त्यामुळे रिपब्लिकन चळवळीला अस्तित्वहीन म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही. उलट वंचित ही संधिसाधू आणि स्वार्थी लोकांची आघाडी आहे. राजकीय स्वार्थासाठी उभारलेल्या या ठिसूळ संघटनेत लोक आले तसे बाहेर पडतात,’अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारदिनी अभिवादन करण्यासाठी प्रा. कवाडे शहरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी प्रकाश आंबडेकरांवर टीका केली. ते म्हणाले, ‘दलित चळवळ विखुरल्यामुळे नेत्यांचा धाक असला तरी सामूहिक शक्ती क्षीण झाली आहे. संघ आणि भाजपशी संबंधित लोक नव्या कृषी कायद्यांचे समर्थन करीत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन संविधानविरोधी आहे, असे सांगत आहेत. भाजपसोबत असलेले रामदास आठवले वारंवार संविधानाचा अपमान करीत आहेत. हा कायदाच घटनाबाह्य असताना शेतकरी आंदोलनाला कसे घटनाविरोधी ठरवता?’ असा सवाल प्रा. कवाडे यांनी केला.

भीमरावांवरही टीका
भीमराव आंबेडकर यांच्या भारतीय बौद्ध महासभेने धर्म आणि जातीच्या रकान्यात आपली जात लिहिण्याचे लिखित आवाहन केले आहे. हा प्रकार बाबासाहेबांच्या जातिअंताच्या चळवळीला मारक आहे. ही बाबासाहेबांचीच बौद्ध महासभा की आरएसएसच्या इशाऱ्यावर चालणारी महासभा आहे, असा सवाल प्रा. कवाडे यांनी केला. भीमराव यांनी या माध्यमातून धम्मक्रांतीचा आणि जातिअंत चळवळीचा पराभव करू नये, असेही त्यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!