नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.
पंतप्रधान मोदी यांनी 27 नोव्हेंबरला फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान जॉन्सन यांना हे आमंत्रण दिले होते. जॉन्सन यांनी हे आमंत्रण स्वीकारले देखील होते. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब म्हणाले होते, की आमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण स्वीकारले होते. यापूर्वी ब्रिटनमधून १९९३ साली जॉन मेजर हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ब्रिटनचे शेवटचे पंतप्रधान ठरले होते.
त्यानंतर ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यांना मायदेशात थांबणे आवश्यक होते. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला. त्यानंतर प्रजासत्ताक दिन सोहळयासाठी कोणाला निमंत्रित करणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण आता करोना स्थितीमुळे कुठल्याही परदेशी प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे यावर्षी कोणतेही परदेशी पाहुणे न बोलावता प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडणार आहे. करोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगात चिंताजनक स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्य देशाच्या किंवा सरकारच्या प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. तर नव्या कोरोनाचा धोका लक्षात घेत बोरिस यांच्या आमंत्रणाला विरोध देखील झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- हेगडेंचे आरोप बोगस, तर मुंडेंवर एफआयआर दाखल करण्यापासून विचलित केलं जातंय – रेणू शर्मा
- राजकीय गोटात खळबळ : विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- कोणाच्या जाण्याने भाजपला फरक पडत नाही; महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला
- ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
- धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा, तुर्तास राजीनामा नाही


