Share

धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा, तुर्तास राजीनामा नाही

Published On: 

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी आज (15 जानेवारी) राष्ट्रवादीने मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

मात्र, भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘हे आरोप गंभीर असून राष्ट्रवादीतील नेत्यांसह चर्चा करून लवकरात लवकर पक्ष म्हणून निर्णय घेतला जाईल’ असे संकेत दिले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!