मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. “आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना किती नैतिकता पाळली होती? असा सवाल करतानाच विरोधकांनी आधी स्वत:ला आरक्षात पाहावे,” असा घणाघाती हल्ला अमोल कोल्हे यांनी केला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्जप्रकरणी NCB कडून अटक, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊ शकते का? “आज जे विरोधात आहेत. त्यांच्याकडे कदाचित आरसे शिल्लक नसावेत. त्यांनी जर आरशात पाहिले तर त्यांच्या मागण्या रास्त आहेत हे त्यांना कधीच वाटणार नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपने त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. हे आरोप खरे की खोटे हे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रीपद सोडावं या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर अशातच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यांनी राजीनामा दिला नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील. नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी आज (15 जानेवारी) राष्ट्रवादीने मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- हेगडेंचे आरोप बोगस, तर मुंडेंवर एफआयआर दाखल करण्यापासून विचलित केलं जातंय – रेणू शर्मा
- राजकीय गोटात खळबळ : विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- कोणाच्या जाण्याने भाजपला फरक पडत नाही; महाजनांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला
- ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
- धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा, तुर्तास राजीनामा नाही


