Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची शिक्षा रद्द

Published On: 

औरंगाबाद – धनादेश अनादरप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिलिंद पाटील यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली एक वर्ष साधा कारावास व ६० लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. एम. एस. देशपांडे यांनी रद्दबातल ठरवली. तसेच पाटील यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सुंदरवाडी येथील जमीन व्यवहारातून पाटील यांनी ३० लाख रुपये स्वीकारल्याचा दावा कोमल पाटणी व पवन कासलीवाल यांनी केला हाेता. तर फक्त ५० हजार रुपये उसने घेतल्याचे पाटील यांनी म्हटले हाेते. या रकमेपाेटी पाटणी यांना पाटील यांनी कोरा धनादेश दिला होता. व्यवहार बारगळल्याने पाटील यांनी ४२ लाखांचा धनादेश दिल्याचे सांगण्यात आले हाेते.

संबंधित धनादेश अनादरित झाल्याने पाटणी व कासलीवाल यांनी पाटील यांच्याविरुद्ध काेर्टात फिर्याद दिली. सुनावणीअंती पाटील यांना शिक्षा ठाेठावण्यात आली. त्याविरुद्ध पाटील यांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. फिर्यादीकडून कागदोपत्री देण्यात आलेली रक्कम व त्या मोबदल्यात देण्यात आलेल्या धनादेशाची रक्कम यात तफावत असल्याचे युक्तीवादा दरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कोर्टाने सर्व बाजू ऐकून मिलिंद पाटील यांची शिक्षा रद्द केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!