Share

तळीरामांना कोरोना लवकर होतो असं म्हणतात; फडणवीसांच गायकवाडांना प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा येऊन देखील विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. तर, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर, कोरोना, वादळ, अतिवृष्टी, भ्रष्टाचार अशा विविध आरोपांवरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी केल्याचे दिसून आले आहे.

कोरोना काळात देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती हाताळण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. दरम्यान, फडणवीसांवर टीका करताना शिवसेना आमदाराचा तोल घसरल्याचे समोर आले आहे.

‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,’ असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. यासोबतच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा देखील एकेरी उल्लेख करत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

संजय गायकवाड यांच्या या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल प्रत्युत्तर दिले आहे. ‘कदाचित आमदार संजय गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल आणि त्यातच त्यांनी पत्रकार परिषद घेतली असेल. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी अशाप्रकारे कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं. कारण मला तर जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला कोरोनाच्या विषाणूने फार काही होईल असं मला वाटत नाही. सामान्य माणसांपेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो असं म्हणतात,’ असा टोला देखील फडणवीसांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!