Share

‘गोकुळ’मध्ये महाडिक गटाचा राष्ट्रवादीला धक्का; एकमेव संचालकाचा सत्ताधारी गटात प्रवेश

Published On: 

कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ सक्षम आणि उत्तमरित्या कार्यरत आहे. गोकुळमध्ये राजकारण आणणे बरोबर नाही, असे सांगत दूध उत्पादकांच्या हिताचा विचार करून या निवडणुकीत आपण सत्ताधारी आघाडी सोबत असल्याची स्पष्ट भूमिका संचालक विलास कांबळे यांनी मांडली.

गेल्या निवडणुकीत कांबळे हे विरोधी राष्ट्रवादी आघाडीकडून निवडून आलेले एकमेव संचालक आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांनी गोकुळच्या सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देऊन, विरोधी आघाडीला मोठा धक्का दिलाय. गोकुळ दूध संघाची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज कार्यकर्ते, सत्ताधारी महाडिक-पाटील गटाला समर्थन देत आहेत.

गोकुळमधील राष्ट्रवादीचे एकमेव संचालक विलास कांबळे यांनीही काल सत्ताधारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. राजकीय ईर्ष्येपोटी विरोध करून, उत्तम चाललेल्या गोकुळ दूध संघाची व्यवस्था कुणी विस्कळीत करू नये, असा टोला विलास कांबळे यांनी लगावला. दूध उत्पादकांच्या आणि संस्थेच्या हिताचा विचार करून आपण या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीसोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या वेळच्या निवडणुकीत विलास कांबळे राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून एकमेव संचालक बनले. गेल्या पाच वर्षात गोकुळचा पारदर्शी कारभार जवळून बघितला. अशावेळी राजकीय भूमिकेतून गोकुळकडं बघू नये, असे सांगत, राष्ट्रवादीच्या विलास कांबळे यांनी, सत्ताधारी आघाडीला समर्थन दिले. हा विरोधी आघाडीसाठी मोठा धक्का असून, निवडणूक होईपर्यंत अनेकजण सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देतील, अशी शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!