जालना: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या महामारीची साखळी तोडण्यासाठी १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे. मात्र, काही नागरिक अत्यावश्यक सेवांसह इतर कारणांसाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळे ठिकठिकाणी गर्दी होत असून यातून संभाव्य धोका वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत समाविष्ट सेवा, आस्थापनांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
यानुसार किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाईची दुकाने तसेच चिकन, मटण, अंडी, मासे, पोल्ट्री दुकाने आदी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी परवानगी दिली आहे. तर इतर अत्यावश्यक सेवा २४ तास सुरू राहणार आहेत. राज्य शासनाने १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली असून यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.
मात्र, मागील ८ दिवसांपासून अत्यावश्यक सेवांचे कारण सांगून काही लोक घराबाहेर पडत आहेत. यामुळे दिवसभर रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ लागली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असून दुसरीकडे काही लोक सर्रास विनाकारण घराबाहेर पडून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे अत्यावश्यक सेवा व आस्थापनांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी बिनवडे यांनी घेतला. यानुसार अत्यावश्यक कारण किंवा सेवेशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
- भाजपचे लोक कढईतल्या गरम वड्यासारखे उकळून फुटू लागलेत; शिवसेनेचं टीकास्त्र
- दिल्ली कॅपीट्ल्सचा पंजाब किंग्सवर ६ गडी राखुन ‘गब्बर’ विजय
- ३० एप्रिल नंतर लस न घेणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर फिरू देणार नाही- आस्तिककुमार पांडे
- ‘या’ राज्यांमधून महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास RTPCR चाचणी बंधनकारक !
- तळीरामांना कोरोना लवकर होतो असं म्हणतात; फडणवीसांच गायकवाडांना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

