🕒 1 min read
मुंबई: कर्नाटक मधील हिजाब प्रकरण देशभरात गाजत आहे. त्याचे पडसाद अनेक राज्यांत उमटत आहेत. कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिम विद्यार्थिनींनी हायकोर्टात दाद मागितली आहे. यावर सुनावणी प्रक्रिया सुरु आहे. आता यावरच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar reaction on Hijab controversy) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी न्यायालयाला विनंती करतो की, ड्रेस कोडबाबत घटनेत किंवा कायद्यात कोणतीही तरतूद नाही. यावर त्वरित निर्णय घ्यावा. त्यामुळे लोकांनी काय परिधान करावे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने याची अंमलबजावणी करावी. हा निर्णय आला तर समाजात शांतता नांदेल, असे मी समजतो.”, असे ट्वीट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
दरम्यान हिजाब प्रकरणावर महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यात राष्ट्रवादीकडून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करून याला विरोध करण्यात आला. आता प्रकाश आंबेडकर यांनी थेट कायदा आणि घटनेचा हवाला दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांच्या शक्ती प्रदर्शनाला योगेश क्षीरसागर यांचे प्रत्युत्तर; राजकीय रिंगणात भाऊ-भाऊ आमने-सामने
- साहाच्या निवडप्रकरणी गांगुलीनंतर आता राहुल द्रविड वादाच्या भोवऱ्यात
- “शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने…”,संजय राऊतांचे कॉंग्रेस आघाडीबाबत मोठे वक्तव्य
- “ ते म्हणाले होते, मी असे पर्यंत तुझे संघातील स्थान अढळ मात्र..” ; साहाचा गांगुलीबाबत मोठा खुलासा
- “चारीमुंड्या चीत करूनच पाटील नावाचा नाही निघाला तर…”, गुलाबराव पाटलांचे खडसेंना थेट आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
