Share

बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांच्या शक्ती प्रदर्शनाला योगेश क्षीरसागर यांचे प्रत्युत्तर; राजकीय रिंगणात भाऊ-भाऊ आमने-सामने

Published On: 

🕒 1 min read

बीड: बीडमधील शिवसेना नेते काका जयदत्त क्षीरसागर (Shiv Sena leader Kaka Jaydatta Kshirsagar)  आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (NCP MLA Sandeep Kshirsagar) यांच्यातील शीतयुद्ध अनेक वर्षांपासून सुरु आहे. लवकरच नगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. आता त्यात नवीन गोष्ट म्हणजे संदीप क्षीरसागर यांचे सख्खे चुलत भाऊ योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बीडमध्ये चांगलेच राजकारण जोर धरू लागले आहे.

दरम्यान आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात योगेश क्षीरसागर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मागील ३० वर्षांपासूवन क्षीरसागर कुटुंबियांचे नगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाऊ-भाऊ आमने-सामने आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजणार असलायचे चित्र आता निर्माण झाले आहे.

दरम्यान क्षीरसागर कुटुंबामध्ये जयदत्त क्षीरसागर , रवींद्र क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर हे तिघे भाऊ राजकारणातील मोठे नेते आहेत. हे तिघेही नेते अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, मात्र भावा-भावामधील आणि काका-पुतण्यातील वाद वाढल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र यंदा काका-पुतण्याच्या लढाईत आता भाऊ-भाऊ आमने-सामने आले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!