मुंबई: रिद्धिमान साहाला श्रीलंकेच्या भारत दौऱ्यात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या संघात जागा मिळाली नाहीये. त्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. रिद्धिमान साहाने आधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. त्यानंतर आता वादाचे चक्र भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे फिरले आहे.
रिद्धिमान साहाला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघात जागा दिली गेली नाही. मात्र याबदल भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड यांनी साहाला आधीच कल्पना दिली होती. नि याचबरोबर त्यांनी साहाला सल्ला दिल्याचेही तो म्हणाला. “यापुढे माझा संघात निवडीसाठी विचार केला जाणार नाही, असे संघ व्यवस्थापनाने मला आधीच सांगितले होते. जोपर्यंत मी भारतीय संघाच्या सेटअपचा भाग होतो तोपर्यंत मी हे सांगू शकत नव्हतो. अगदी प्रशिक्षक राहुल द्रविडनेही मला निवृत्ती घेण्याचा विचार करा असे सुचवले होते. असा नवा गौप्यस्फोट साहाने केला आहे.
संघाच्या निवडीची घोषणा झाल्यापासून रिद्धिमान साहा अनेक मोठे खुलासे उघड करत आहे. यामुळे अनेक वादांना तोंड फुटले आहे. सगळीकडून रिद्धिमान साहाला सहानुभूती मिळत आहे. तर माजी खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. श्रीलंका दौऱ्याच्या आधीच हे वाद नव्याने जोर धरत आहे.
महत्वाच्या बातम्या
- “शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने…”,संजय राऊतांचे कॉंग्रेस आघाडीबाबत मोठे वक्तव्य
- “ ते म्हणाले होते, मी असे पर्यंत तुझे संघातील स्थान अढळ मात्र..” ; साहाचा गांगुलीबाबत मोठा खुलासा
- “चारीमुंड्या चीत करूनच पाटील नावाचा नाही निघाला तर…”, गुलाबराव पाटलांचे खडसेंना थेट आव्हान
- “महाराष्ट्रावर एखादा थुंकत असेल तर आम्ही त्याची…”, संजय राऊतांचा इशारा
- रिद्धिमान साहाला पत्रकारांकडून धमकीचे मेसेज; फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

