Share

“बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीची किंमत नाही”; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Published On: 

मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना आम्ही काडीची किंमत देत नाही आणि तुम्ही जर दादागिरी कराल तर उत्तर आम्ही देऊ असे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. एवढचं नाही तर दादागिरी कराल तर दादागिरी मोडून काढू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राम मंदिर बांधण्याचा निर्णय तुम्ही नाही तर कोर्टाने घेतला आहे. तकलादू हिंदू आता नवीन आले आहे. “बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग आहे त्यांना आम्ही काडीची किंमत देत नाही. आम्ही जे करतो ते बेस्टच करतो आणि करत राहू यासाठी हा कार्यक्रम आहे”. या पाश्वर्भूमीवर प्रवीण दरेकरांना विचारले असता दरेकर म्हणाले, सत्तेमुळे त्या ठिकाणी त्यांची विचारधारा पूर्णपणे बदलल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी आपण काय म्हणालात हे पूर्ण जगाला माहितीये. नवहिंदू त्यांचं आहे आमच हिंदुत्व तेच आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे त्यांचं हिंदुत्व त्यांना आता नवहिंदुत्व दिसत आहे”.

आमच हिंदुत्व गदाधारी आहे घंटादारी नाही असे, उद्धव ठाकरे म्हणाले. यावर दरेकरांना प्रतिक्रिया विचारली असता दरेकर म्हणाले, “मुख्यमंत्री पदावर राहून आदेश हिशोब देणार असतील तर हे दुर्दैवाचे आहे, गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री पदाची गरिमा राहिलेली नाही त्यामुळे कोण गदादारी हिंदुत्व आहे हे जनता ठरवत असते. जनतेला सर्व माहित आहे”.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!