मशिदींवरील आणि इतर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यामध्ये आपण भोंगे काढण्याचा निर्णय देऊ शकत नाही मात्र आवाजाच्या पातळीवर मर्यादा लावल्या जाऊ शकतात असे, गृहमंत्री यावेळी म्हणाले होते.
त्यावर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.