मुंबई : मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता. यानंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली गेली आहे. कोरोना संकट वाढलं आहे, शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होत्या. त्यामुळे सारासार विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कारण त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आले आणि एमपीएससी परीक्षा परीक्षेच्या दोन दिवस आधीच पुढे ढकलली गेली. सरकारने परीक्षा पुढे ढकलत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिला मात्र आता इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी करायचं काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
तर, मंत्री छगन भुजबळ व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील या परीक्षा पुढे ढकलण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडं, ओबीसी समाज देखील आरक्षण अबाधित राहावं, मेगा भरतीसह स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेतल्या जाव्यात यासाठी रस्त्यावर उतरला आहे.
याविषयी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे. ‘रखडलेल्या एमपीएससी परीक्षा, मेगा पोलीस भरती लवकरात लवकर घेतली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘सदर प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात असून इतर समाजांचा देखील सरकारने विचार करायला हवा’ असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
‘मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू; शिवसेना हिंदुत्ववादीच!’
साताऱ्यात दोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी ठोकणार शड्डू!
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
सर्वोत्कृष्ट गीतकार उदित नारायण यांचा ६५ वा जन्मदिवस
धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!


