Share

‘मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू; शिवसेना हिंदुत्ववादीच!’

Published On: 

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधून त्यांनी आज अधिकृतरित्या प्रवेश केला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

शिवसेनेत आल्यानंतर कोणतं पद देण्यात आलं आहे का? असा प्रश्न केला असता त्यांनी, ‘मी एक सामान्य शिवसैनिक म्हणून पक्षात प्रवेश केला आहे. माझी पक्षात काम करण्याची इच्छा आहे’ असं उत्तर दिलं. तर, विधानपरिषदेची आमदारकी हे या राजकीय क्षेत्रातील पहिलं मोठं पाऊल असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान, त्यांनी भाजपवर निशाणा देखील साधला आहे. ‘भाजपाकडून मला पुन्हा एकदा ट्रोल केलं जात आहे, पण त्यांच्या ट्रोलमुळे मी बरोबर चालले हे मला कळतंय, त्यांचे ट्रोल हीन पातळीवरचे असतात’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

सद्या भाजप आणि शिवसेनेमध्ये हिंदुत्वावरून खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येत आहे. यावर बोलताना त्यानं म्हणाल्या, ‘शिवसेना हा हिंदुत्ववादीच पक्ष आहे. मी जन्माने हिंदू, माझा धर्म हिंदू आहे. हिंदू धर्माबद्दल खूप बोलू शकते, आपला धर्म हा जिव्हाळ्याचा, आस्थेचा असतो, दरवेळी वेशीवर उभं राहून उहापोह करण्याची गरज मला वाटली नाही’ असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!