शिर्डी – गेल्या काही दिवसांपासून भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर गंभीर आरोप करताना दिसून येत आहेत. विशेषतः माजी गृहमंत्री अनिल देशमुख,हसन मुश्रीफ आदी राष्ट्रवादीचे नेते सोमय्या यांच्या रडारवर आहेत. सोमय्या यांच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी चांगलीच घायाळ झाल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीचे नेते ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोमय्या यांच्या आरोपांवर पत्रकार प्रश्न विचारात आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अधिकचे सोमय्या यांच्यावर बोलण्यास नकार दिल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. शिर्डी येथे श्रीरामपूर व रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा व परिवार संवाद साधण्यासाठी जयंत पाटील आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी जयंत पाटील यांनी सोमाय्यांच्या आरोपांवर बोलणे टाळले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना लगावला.
महत्वाच्या बातम्या
- मिरज दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरात येण्याची परवानगी मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांनाच फटकारलं
- आयपीएलमध्ये फक्त पन्नास रुपये गुंतवून सलूनवाला रातोरात झाला करोडपती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

