🕒 1 min read
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षात बसावं लागलेल्या भाजपने हे सरकार कोसळेल असं वारंवार भाकीत केलं होतं. तर, गेल्या काही महिन्यांमध्ये महाविकास आघाडीतील मंत्र्यांसह नेत्यांवर गंभीर आरोप होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे, महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र असल्याचं मविआ नेते म्हणत आहेत.
अशातच, १०० कोटींच्या खंडणीचा आरोप मुंबईचे माजी आयुक्त परमबीरसिंह यांनी केल्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने (CBI) छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, सीबीआयच्या कारवाईवर राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते टीका करू लागले आहेत तर भाजप नेते या कारवाईचे स्वागत करताना दिसून येत आहेत. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांवरील कारवाई ही महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र आहे. भाजपच्या अनेक नेत्यांवर देखील पैशांचे गंभीर आरोप आहेत. मात्र, त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही.आता देशात न्यायच राहिलेला नाही,असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय! रेमडेसिवीर, लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार
- शहरात तुटवडा, मनपाने मागवले १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन!
- पीपीई कीट घालत कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करणाऱ्या खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- राज्यात लवकरच मोफत लसीकरण ? अजित पवारांनी दिले संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
