Share

अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय! रेमडेसिवीर, लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार

Published On: 

पुणे : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनसह लसीचा तुटवडा निर्माण झालाय. भविष्यात रुग्णसंख्या वाढणार हा अंदाज लक्षात घेऊन आता राज्य सरकारने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेमडेसिविर आणि कोरोनाच्या ज्या ज्या लसींना देशात मान्यता मिळाली आहे, त्या लसींच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

अजित पवार म्हणाले की, ग्लोबल टेंडरची प्रक्रिया येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने टेंडरबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात आलेत. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लस यासाठी हे टेंडर असेल.

टोलवाटोलवी चालणार नाही
१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातल्या लोकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारचे म्हणणे आहे की राज्यांनी ही जबाबदारी घ्यावी. राज्ये म्हणतात की केंद्राने ती जबाबदारी घ्यावी. पण टोलवाटोलवी करून चालणार नाही. आम्ही त्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पाच जणांची कमिटी स्थापन केली आहे. त्यात मुख्य सचिव अध्यक्ष असतील. त्यांच्यासोबत, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त, सार्वजनिक आरोग्याचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षणचे सचिव आणि उद्योग खात्याचे सचिव त्याचे सदस्य असतील. टेंडर काढायच्या सूचना सीताराम कुंटेंना दिल्या आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!