Share

‘यापेक्षा मोठा अन्याय नाही’ ; श्रीलंका दौर्‍यासाठी तेवतियाची निवड न झाल्यामुळे आकाश चोप्रा नाराज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघ नुकताच इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सध्या भारतीय संघ हा विलगीकरणात असुन न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुचा दुसरा संघ हा पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

मर्यादित षटकांची ही मालिका १३ जुलैपासुन सुरु होउन २५ जुलै पर्यंत चालणार आहे. यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १३ जुलै, दुसरा १६ आणि तिसरा सामना १८ जुलै रोजी होणार आहे. तर टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ जुलै, दुसरा २३ जुलै आणि अंतिम सामना २५ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे.

बीसीसीआयने श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. यात काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे आहेत. या  संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती देण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे. 6 नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र 24 खेळाडूंच्या यादीत अष्टपैलू राहुल तेवतियाचे नाव नाही. राहुल तेवतियाला संघात न निवडल्याबद्दल भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने नाराजी व्यक्त केली आहे.

आकाश चोप्रा चॅनलवर म्हणाला, ‘राहुल तेवतिया कुठे आहे? या संघाची शेवटची निवड झाली तेव्हा तो तिथे होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. यापेक्षा मोठा अन्याय असू शकत नाही. तुम्ही एखाद्या खेळाडूला संधी न देता बाहेरचा रस्ता दाखवा.

आकाश चोप्रा म्हणाला की, राहुल तेवतिया यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी दिली गेली नव्हती आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आकाश चोप्रा पुढे म्हणतो की, जेव्हा तुम्ही भारतीय संघात कोणाची निवड करता तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब आणि प्रशिक्षक आनंदी असतात. आपण त्याला अपयशी किंवा यशस्वी होण्याची संधी दिली नाही आणि आपण त्याला संघातून वगळले. असे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!