🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.
या दौऱ्यात अनेक युवा खेळाडुंना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. तर खराब कामगिरीमुळे संघाबाहेर झालेल्या काही खेळाडुंना पुन्हा संधी मिऴेल अशी आशा होती. यातीलच एक नाव म्हणजे वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल. गुरुवारी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा स्वत:चे नाव संघात नसल्याने सिद्धार्थ कौलने नाराजी ट्विट करुन व्यक्त केली. ‘मी आयुष्यात सतत अपयशी ठरलो, पण यामुळेच मी आज यशस्वी झालो. आणि जेव्हा मी अपयशी होतो तेव्हा माझ्या चेहऱ्यावरील हसु मला पुन्हा जोमाने तयारी करण्यास प्रवृत्त करते.’ या प्रकारे त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
I have failed over and over again in my life and that is why I succeed. And when I fail I have the smile on my face which motivates me work even harder. #fridayfitness #fridaymorning #smile #cricketer #cricket #trending @SunRisers #indiancricketteam #Cricket #IndianCricketTeam pic.twitter.com/IDZE1ptKHR
— Siddharthh Kaul (@iamsidkaul) June 11, 2021
सिद्धार्थ कौलने भारताकडुन तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळलेले आहे. आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादकडुन खेळत असतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2008च्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. सिद्धार्थ कौलच्या व्यतिरीक्त अनेक युवा खेळाडुंना या दौऱ्यात संधी मिळाली नाही. यात जयदेव उदानकट, राहुल तेवतिया, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक या सारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सीएसकेचा सदस्य होणे ही सकारात्मक बाब’, श्रीलंका दौऱ्यावर निवड झालेल्या ‘या’ खेळाडुने मांडले मत
- ‘साराने माझ्याकडे हात जोडून काम मागितलं’, रोहित शेट्टीचा खुलासा
- डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यापूर्वी कोहली-रहाणे यांच्यात रंगले ‘युद्ध’
- फ्रेंच ओपन अंतिम फेरीत प्रवेश करताच ग्रीसच्या त्सित्सिपासने घडवला इतिहास
- फ्रेंच ओपन: जोकोविचा अंतिम फेरीत प्रवेश, नदालचा पराभव करत परतफेड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
