मुंबई – धनंजय मुंडे हे माझे पती आहेत आणि ही वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यांनी स्वतः याची कबुली दिली आहे.ज्या पद्धतीने इतरांच्या बायका त्यांच्या नवऱ्याचा पैसा खर्च करतात तसा मी सुद्धा करत असते. मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते हे जगजाहीर आहे असे सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी नुकताच फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, माझे पती जे मला पैसे देत त्यातून वाचवून ठेवलेल्या पैशातून मी आज समाजसेवा करत आहे. मला महागडे दागिने किंवा महागतील साड्यांची नव्हे तर समाजसेवेची आवड आहे. मी किंवा माझे पती जे काही करत आहोत ते जनतेचेच पैसे आहेत त्यामुळे मी जे काही काम करत आहे त्यात कोणतीही मोठी गोष्ट नाही. मला वहिनी साहेब लोकं म्हणतात हीच माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे.
यावेळी त्यांना ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला.करुणा मुंडे ही धनंजय मुंडे यांची कितवी पत्नी आहे हे विचारणाऱ्या लोकांना त्यांनी आवाहन केले की माझ्यावर कोर्टाचे असणारे निर्बंध हटवण्यास मुंडे यांना सांगा. न्यायालयातून माझे तोंड बंद करण्यात आले आहे. मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली आहेत असे त्या म्हणाल्या.
ट्रोल करणाऱ्या लोकांना ५-६ बायका असणारा व्यक्ती देवता वाटतो मात्र २५ वर्षांपासून एकनिष्ठ असणारी स्त्री जर वेश्या वाटतअसेल तर तो तुमच्या दृष्टीचा दोष आहे हा माझा दोष नाही. तुमच्यामध्ये खरच हिम्मतअसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला सांगा की माझ्यावरील बोलण्याचे निर्बंध हटवा म्हणून. जर हे निर्बंध हटवले तर मी मीडियासमोर जाऊन सत्य सांगेन. कोणत्याही महिलेला ललकारू नका. लवकरच पुन्हा लाईव्ह येवून ट्रोल करणाऱ्या लोकांच्या सर्वप्रश्नांची उत्तरे देईन असे त्यांनी खडसावले.
महत्वाच्या बातम्या
- नव्या इंनिगंसाठी ‘राणादा’ सज्ज; न्यु लुक्सची सर्वत्र चर्चा.
- कसोटीचे महाभारत! सहावा सामन्यात मंयकच्या द्विशतकाने बांग्लादेश चित
- सहा षटकार मारल्यानंतर अशी होती धोनीची प्रतिक्रिया ; युवराज सिंगने सांगितला किस्सा
- ‘सौ चुहे खा के बील्ली चली हज को’ गैरवर्तनानंतर शाकिबने मागितली माफी
- फ्रेंच ओपन: जोकोविचा अंतिम फेरीत प्रवेश, नदालचा पराभव करत परतफेड


