🕒 1 min read
जळगाव : जिल्ह्यातील बोदवड येथील नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत भाजपा नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. बोदवड शहरामध्ये पिण्यासाठी पाणी मिळत नाही, महिलांचे हाल होत असताना मात्र राज्य सरकारने दारु स्वस्त केली, आता लोकांनी दारु प्यायची का? असा सवाल गिरीश महाजनांनी केली आहे.
गिरीश महाजन म्हणाले, महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. राज्यात व जळगाव जिल्ह्यात शेतकर्यांना काय नुकसान भरपाई मिळाली. मोठ्यांची नावं रेशनकार्डावर आणि गरजू रेशनकार्डपासून वंचित असे म्हणत महाजनांनी सरकारवर टीका केली.
महाविकास आघाडीच्या काळात गेल्या दोन वर्षांत एकही भरती झालेली नाही. अन जी भरती झाली त्यातही भ्रष्टाचार केला. म्हाडा असो की आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया एकही परीक्षा पारदर्शक झाली नाही.
बोदवड शहरामध्ये पाणी पिण्यासाठी मिळत नाही महिलांचे हाल होत असतात मात्र हे त्यांना दिसत नाही. राज्य सरकारने दारू स्वस्त केली आणि प्यायला पाणी नाही. आता लोकांनी दारू प्यायची का अशा शब्दात महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला.
महत्वाच्या बातम्या
- ”दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय?”; दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका
- ‘..तर भाजपने आपल्या १०५ आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी’
- खडसेंनी आता दुकानदारी बंद करावी- गिरीश महाजन
- सहकार क्षेत्र खाजगी लोकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र चाललेले आहे-देवेंद्र फडणवीस
- ”सहकाराबाबत आम्हाला कुणी सल्ला देऊ नका”, अमित शहांचा शरद पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
